ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो! - अजय सायकर

प्रभाग क्र. ४ (ब) - कृष्णानगर 

ठळक कामं - 
0 थरमॅक्स चौक ते साने चौकापर्यंत रस्तादुभाजक केलं.
0 बचतगटांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण केलं. 
0 हुशार, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली.
0 प्रभागात भाजीमंडईची सोय केली.
0 प्रभागातील ड्रेनेजलाईन, जलवाहिन्या दुरुस्ती तसेच नव्याने टाकून दिल्या. 
0 प्रभागात उद्यानाची निर्मिती केली.
0 ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू केले.
0 सांस्कृतिक भवन आणि बहुउद्देशीय कार्यालये सुरू केली.

वर्षभरातील प्रस्तावित कामं -
0 स्पाईन रोड चौकात ओव्हरब्रीज उभारणार
0 पथारीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करणार.
0 संगीत कारंजे सुरू करणार.
0 अपघातविरहित रस्ते तयार करणार.

पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) - लोकप्रतिनिधी अथवा नगरसदस्य कसा असावा, याबाबत अनेक मतं असू शकतात. प्रत्येक नगरसेवकाची काम करण्याची आपली एक खास पद्धत अथवा शैली असते. काहीजणं मोठा गाजावाजा करत काम करीत असतात, तर काहीजणं शांतपणे आपलं कर्तव्य पार पाडत असतात. प्रभाग क्र. ४ (ब) कृष्णानगरचे नगरसेवक अजय शंकरराव सायकर हे असेच एक नगरसेवक, जे शांतपणे आपलं काम करीत राहतात. ४ वर्षात अजय सायकरने चांगली कामं केली आहेत, हे त्यांच्या प्रभागातील नागरिक अगदी मोकळेपणाने मान्य करतात, तेव्हाच त्यांच्या व्यक्तिमत्वातील हे छुपे गुण समोर येतात. अतिशय साधी राहणीमान, शांतपणे बोलणं, आपल्या कामांचा उगाचच बाऊ न करणं अशा त्यांच्या स्वभावामुळे त्यांची एक वेगळीच छाप लोकांवर पडते. मी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो, असं ठामपणे सांगणार्‍या अजय सायकर यांच्या मताशी त्यांच्या प्रभागातील नागरिक तरी नक्कीच सहमत होतील.

केबी 9 न्यूजवर आयोजित विकासकामांचा लेखाजोखा या मालिकेतील आजची मुलाखत प्रभाग क्र. ४ (ब) चे नगरसेवक अजय सायकर यांच्या निवासस्थानी पार पडली. सायकर यांनी आपल्या राजकीय प्रवासाचं वर्णन केलं. त्यांचे वडिल शंकरराव तथा अप्पासाहेब हे स्विकृत सदस्य असल्यामुळे त्यांना राजकारणाची पार्श्वभूमी होतीच. पण त्याहीअगोदर सामाजिक कामात सायकर कुटुंबिय अग्रेसर होतेच. वडिलांमुळे घरात विविध स्तरातील लोकांची उठ-बस होती. लोकांच्या अडचणी जवळून जाणता आल्या. त्यामुळे नगरसेवकपद मिळाल्यानंतर या अभ्यासाचा फायदा झाला. वडिलांचे मार्गदर्शन तर असायचेच. पण कोणताही निर्णय विचारपूर्वक घेऊन मगच अंमलबजावणी करायची सवयही अजय सायकर यांना यामुळे लागली. 

सायकर यांचा प्रभाग प्राधिकरणात येत असल्यामुळे अनेक सोयी-सुविधांची वानवा होतीच. या प्रभागातील लोकसंख्या आहे, ४० ते ४५ हजार. १९९१-९२ मध्ये प्राधिकरणाने फुलेनगरमध्ये ज्या ड्रेनेजलाईन टाकल्या होत्या, त्या १८ वर्षांनंतर अजय सायकर यांनी बदलल्या. प्राधिकरणाने नागरिकांच्या सुविधेसाठी मनपाच्या ताब्यात ३८ ते ४० प्लॉट दिले. २०१२ साली अजय सायकर यांनी तो भाग विकसित केला. नागरिकांसाठी उद्यान बांधले. थरमॅक्स चौक ते साने चौकपर्यंतचा त्यांचा प्रभाग येतो. या पट्ट्यात सायकर यांनी वाहतुक कोंडी कमी होण्यासाठी डिव्हायडर बांधले. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही घटले. ज्येष्ठ नागरिकांसाठी २ विरंगुळा केंद्र बांधली. २ सांस्कृतिक भवन उभारले. २ बहुउद्देशीय सभागृह उभारताहेत. बचतगट सुरू करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले. प्रभागातील हुशार मुलांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. रस्ते, वीज, पाण्याची सोय, ड्रेनेजलाईन, डांबरीकरण, सिमेंट ब्लॉक टाकणे अशी सर्व कामं केली. लोकांसाठी भाजीमंडईची सोय केली. 

अर्थातच ही कामं खूप सहजासहजी झालेली नाहीत. प्राधिकरणात कोणतीही लोकनियुक्त बॉडी नसल्यामुळे कामात खूप अडचणी आल्या. शिवाय प्राधिकरणातील माणसं सहकार्य करत नाहीत, असा स्पष्ट आरोप करतानाच महापालिका आणि प्राधिकरण यांच्यात समन्वय असण्याची गरज सायकर यांनी अधोरेखित केली. या समन्वयामुळे अनेक कामं झटपट होऊ शकतील, असे ते म्हणतात. येत्या वर्षभरात सायकर यांना अनेक कामं करायची आहेत. स्पाईनरोड चौकात ओव्हरब्रीजची उभारणी, पथारीवाल्यांसाठी हॉकर्स झोन, अपघातविरहित रस्ते देण्याचा मानस ते व्यक्त करतात.  सायकर यांचं सर्वात मोठं स्वप्न आहे, ते म्हणजे म्हैसूरच्या धर्तीवरील संगीत कारंजे उद्यान निर्माण करणं! येत्या वर्षभरात सायकर त्यांचं हे स्वप्न नक्कीच साकारतील, अशी अपेक्षा ठेवूयात.