ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

अभ्यासपूर्ण नियोजनामुळेच प्रभागातील ८० टक्के कामं पूर्ण! - राहुल जाधव

प्रभाग क्र. ५ (ब) - जाधववाडी, चिखली 

ठळक कामं- 
0 प्रभागातील सर्व अंतर्गत रस्ते पूर्ण केले.
0 बचतगटांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण केलं. 
0 हुशार, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली.
0 अंडरग्राऊंड केबल वाहिन्यांचं काम पूर्ण केलं.
0 प्रभागातील ड्रेनेजलाईन, जलवाहिन्या दुरुस्ती तसेच नव्याने टाकल्या. 
0 प्रभागात स्वखर्चाने खेळाचे मैदान आणि उद्यानाची निर्मिती केली.

वर्षभरातील प्रस्तावित कामं-
0 जलकुंभ उभारण्यासाठी प्रयत्न करणार.
0 डी.पी. रस्त्यांची कामे पूर्ण करणार.
0 कुदळवाडीत शाळा सुरू करणार.

पिंपरी, दि. ७ (प्रतिनिधी) - निवडणूक आली की मतदारांवर आश्‍वासनांची खैरात केली जाते. आपल्या प्रभागासाठी मी अमूक काम करेन, तमूक काम करेन, अशी वचनं दिली जातात. पण प्रत्यक्षात पाच वर्षांच्या कालावधीत या आश्‍वासनांपैकी अथवा वचनांपैकी किती खरे होतात आणि किती हवेत विरतात, हे मतदारच उत्तमरित्या सांगू शकतात. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधी असतात, जे दिलेल्या आश्‍वासनबरहुकुम कामं करतात. प्रभाग क्र. ५ (ब) जाधववाडी-चिखलीचे नगरसेवक राहुल गुलाब जाधव हे अशाच मोजक्या नगरसेवकांपैकी! राहुल जाधव यांनी २०१२ साली आपल्या मतदारांना जो जाहिरनामा दिला होता, त्या जाहिरनाम्यातील बहुतांश सर्व म्हणजे ८ ते ९ ठळक विकासकामं त्यांनी पूर्ण केल्याचं ते अभिमानाने आणि छातीठोकपणे सांगतात! सुरुवातीपासूनच अभ्यासपूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यामुळे कामं झटपट आणि वेळेत पूर्ण होत आल्याचं ते सांगतात. 

केबी9 न्यूजवर आयोजित विकासकामांचा लेखाजोखा या मालिकेतील आजची मुलाखत देण्यासाठी प्रभाग क्र. ५ (ब) चे नगरसेवक राहुल जाधव आले होते. आपल्या कामांबाबत अतिशय उत्साहाने ते बोलत होते. चिखली-जाधववाडी परिसराचा त्यांचा संपूर्ण अभ्यास असल्याचं वारंवार जाणवलं. १९९७ साली हा परिसर महापालिकेत समाविष्ट झाला. वास्तविक तेथील रहिवाशांचा याला विरोधच होता. पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आश्वासनानंतर ते या बाबीसाठी राजी झाले. मात्र महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही या परिसराच्या वाट्याला दुर्लक्ष आणि परवडच आली. लोकप्रतिनिधीही नवखे असल्यामुळे तसेच प्रशासनाच्या असहकार्यामुळे विकासकामांचा निधी ते आपल्यापर्यंत आणू शकले नाही. त्यामुळेच गेल्या १६ वर्षात रस्त्यांची कामे केवळ २० ते ३० टक्केच होऊ शकली. त्यामुळे मी निवडणुकीला उभा राहिल्यानंतर या सर्व बाबींचा अभ्यास केला. हा परिसर औद्योगिक वसाहतीचा आहे, शिवाय सर्वात मोठी भंगाराची गोदामं इथे आहेत, आशिया खंडातील सर्वात जास्त परप्रांतीय या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे प्रभागातील कामांचं व्यवस्थित नियोजन केलं. लोकहितांच्या प्रश्‍नांसाठी मी अनेकदा उपोषण केलंय. कामं करताना आ. महेश लांडगे यांचं खूप सहकार्य लाभलं, असं राहुल जाधव सांगतात.

भंगार गोदामांना लागलेल्या आगीमुळे चिखली-जाधववाडी परिसराचं नाव अवघ्या राज्यात पोहोचलं. याबाबत बोलताना जाधव म्हणतात, खरंतर आग लवकर आटोक्यात यायला हवी होती. पण रस्त्यांच्या दुर्दशेमुळे अग्निशामक दलाचे बंब वेळेत पोहोचू शकले नाहीत. जाधव याबाबत नगररचना विभागाच्या चुकीच्या नियमावलींना दोष देतात. विकासकामांचा आराखडा सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी हे नियम बदलावेत, आयुक्त राजीव जाधव यांनी आपल्या अधिकारांचा व्यवस्थित वापर करावा. याचा प्रत्येक प्रभागालाच उपयोग होईल, असं ते म्हणतात. परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. भूमिगत विद्युतवाहिन्यांचं काम पूर्ण झालंय. २०१२ साली मी माझ्या नागरिकांना जो जाहिरनामा दिला, त्यातील जवळपास सगळीच कामं पूर्ण केली आहेत. उर्वरित येत्या वर्षभरात पूर्ण करीन, असं जाधव म्हणतात.  

जागांच्या आरक्षणाचा तिढा या प्रभागात असल्यामुळे अनेक कामं मनासारखी करता येत नाहीत. त्यामुळे या परिसरात गट नं. ५३९ इथं जाधव यांनी लाखो रुपये खर्चून स्वखर्चाने खेळाचे मैदान आणि उद्यान सुरू केलंय. मुलांना शिक्षणाचा लाभ घेता यावा, यासाठी मोठी शाळा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. माणसाच्या अंगात जिद्द असेल तर तो काहीही करू शकतो, हे राहुल जाधव यांचं वाक्य त्यांच्या धडाडीकडे पाहून खरंच असल्याचं पटतं!