ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हिटलरप्रमाणे माेदींनी अाणली राजकीय, अार्थिक अस्थिरता

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम हिटलरच्या धर्तीवरच सुरू आहे. हिटलरनेही आधी राजकीय व नंतर आर्थिक अस्थिरता आणली होती. मग जर्मनीतील आर्थिक व्यवहारावर नियंत्रण आणले आणि त्यानंतर स्वत:ला हुकूमशहा जाहीर केले हाेते, असे स्पष्ट करत मोदी यांच्या नोटबंदी निर्णयाबाबत ‘महाराष्ट्र लोकशाही आघाडी’ जनतेचे प्रबोधन करणार असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी दिली.

नोटबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी कारणे सांगितली ती सर्व बनावट होती. ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनी तो ८ नोव्हेंबरच्या आधीच्या ५६ दिवसांत बँकांमध्ये भरल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान नोटबंदीची घोषणा करताना म्हणाले होते की, ‘या निर्णयाबाबत पूर्ण गुप्तता पाळली होती.
मंत्र्यांनाही त्याची माहिती नव्हती.’ गुप्तता पाळली होती तर रिझर्व्ह बँकेने १६ सप्टेंबर व ११ नोव्हेंबर २०१६ या काळातील जमा झालेल्या बँक डिपॉझिटची जी माहिती जाहीर केली आहे त्यानुसार मोदींचा गुप्ततेचा दावा खोटा स्पष्ट होतो, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.

काळा पैसा गेला कुठे?
नोटबंदीच्या निर्णयानंतर ५६ दिवसांत देशातील बँकांमध्ये जमा झालेली रक्कम ३ लाख २३ हजार ८२३ कोटी रुपये इतकी होती. हा आकडा नेमका इतकाच आहे, जितका पैसा लोकांनी स्वत:कडे साठवून ठेवल्याचा अंदाज होता. याचा अर्थ काळा पैसा नोटबंदीनंतर बाहेर आलाच नाही, असा दावा करताचा नाेटाबंदीमुळे माेदींचा उद्देश सफलच झाला नसल्याचा अाराेपही आंबेडकर यांनी केला.
लोक आज अगदी गरजेइतकाच पैसा खर्च करत आहेत, उरलेला पैसा घरातच साठवत आहेत. नोटबंदीमुळे भविष्यात देशात मंदी येणार असून त्याचा फटका सामान्य माणसाला बसेल, अशी भीतीही आंबेडकर यांनी व्यक्त केली.