ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गुजरातमधून भाजपला संपवणार, हार्दिक पटेलची गर्जना

अहमदाबाद, दि. 6 - सन 2017 मध्ये गुजरातमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला आम्ही संपवू, अशी गर्जनाच पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेलने केली आहे. आमच्या समाजातल पटेलांनीच भाजपला सत्तेवर आणले होते. आता तेच त्यांना धूळ चारतील. शेतकर्‍याचा मुलगा या नात्याने मी गुजरातला हे वचन दिले आहे, असे हार्दिकने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी आरक्षणासाठी हार्दिकने गुजरातमध्ये मोठे आंदोलन केले होते. माझ्या आंदोलनाला मोदी सरकार घाबरले आहे. परंतु मोदी आणि अमित शहा यांच्याप्रमाणे मला काही लपवण्याची व कोणाला घाबरण्याची गरज नाही, असे तो म्हणाला. तुम्ही एखाद्यावर राजद्रोहाचा आरोप लावण्यासारखे दुसरे वाईट कार्य करू शकत नाही. सरकारने माझ्यावर राजद्रोहाचा आरोप लावला. त्यानंतर 9 महिने मला तुरूंगात ठेवले. परंतु यामुळे मी खचलो नाही तर आणखी मजबूत झालो आहे. मला देशातील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. माझ्या वयाचे युवक माझ्याबरोबर आहेत. यापेक्षा सरकार माझ्याबरोबर आणखी वेगळे काय करू शकते, असा सवाल केला.
भाजपवर निशाणा साधताना तो म्हणाला, भाजप जनतेचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा कितीही दावा करत असले तरी यात काहीच तथ्य नाही. माझ्या कुटुंबीयाने भाजपच्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली होती. परंतु भाजप त्या लोकांना विसरली आहे. भाजप आता त्यांचे प्रतिनिधीत्व करत नाही. मी आरक्षण मागत आहे, भीक मागत नाही. मी फक्त सरकारी नोकरी आणि दाखल्यांवर पाटीदार समाजाला समान संधी मिळण्याची मागणी करत आहे. मी एससी, एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणाविरोधात नाही. मला देशाच्या विकासासाठी आरक्षणाची आवश्यकता वाटते, असे तो म्हणाला.
हार्दिक पटेलने सरकारी धोरणांचाही विरोध करत अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर निशाणा साधला. सरकार काहीच काम करत नसल्याचा आरोप त्याने केला. भाजप हा पक्ष महिला विरोधी पक्ष असल्याचीही टीका त्याने केली. निर्भया कांडवर सर्वाधिक गोंधळ भाजपने केला. परंतु, महिलांसाठी भाजपने काय काम केले, हे भाजपच्या नेत्यांनी सांगावे, असे आवाहन केले.