ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चॅनेल बंद करणार कपिल शर्मा शो

मुंबई, दि. २७ - आपल्या विविध कारनाम्यांमुळे गेल्या काही काळापासून चर्चेत आलेला अभिनेता कपिल शर्मा चांगलाच अडचणीत आला आहे. सध्या सोनी टीव्हीवरील कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’वर बंदीचे सावट घोंघावत आहे. या सावटाला सहकलाकार सुनिल ग्रोव्हर आणि कपिल यांच्यातील वादाची झालर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या दोन कलाकारांच्या वादाचा फटका कार्यक्रमाच्या टीआरपीला बसत असल्यामुळे शो बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वत:हूनच हा शो बंद करण्याचा विचार सोनी टीव्ही चॅनेल करीत असल्याचे समजते.
दरम्यान, पुढच्या महिन्यात ‘द कपिल शर्मा शो’चा सोनी टीव्ही सोबत असलेला करार संपत आहे. हिच संधी साधत सोनी टीव्ही कपिलला नारळ देण्याच्या विचार करू शकते. दरम्यान, सोनीकडून हा शो पुढे सुरू ठेवण्याबाबत किंवा बंद करण्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र, या वृत्ताची बॉलिवूड आणि सिनेवर्तुळात जोरदार चर्चा आहे. दरम्यान कपिलच्या कारनाम्यांमुळे अनेक सेलिब्रेटी मंडळींनीही त्याच्या शोमध्ये यायला नकार दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमांचे चित्रीकरण रद्द करण्याची नामुष्कीही कपिलवरती ओढावली होती. डीएनएने याबाबत वृत्त दिले होते. चित्रीकरण रद्द झाल्यामुळे कपिल आपला आगामी चित्रपट ‘फिरंगी’च्या शूटिंगसाठी कपिल बिकानेरला रवाना झाला असून २९ मार्चला मुंबईत परतणार असल्याचीं पुष्टी या वृत्तात करण्यात आली आहे.
चॅनलने या शोचा संपत असलेला करार वाढवण्यास नकारही दिला नसल्याचे म्हटले आहे. कपिल शर्माने पारदर्शकतेच्या मुद्दयावरून सरकारविरूद्ध केलेल्या टिकेनंतर तो चांगलाच अडचणीत आला होता. या प्रकरणाची चर्चा काहीशी थांबते न थांबते तोच, ऑस्ट्रेलियाहून येत असताना सुनिल ग्रोव्हरला विमानात मारहाण केल्याचे वृत्त आले आणि कपिल पुन्हा एकदा चर्चेत आला. या प्रकारामुळे मोठा वादही सुरू झाला. दरम्यान, या सर्व चर्चाच असून, वास्तव कळण्यासाठी काही दिवस तरी वाट पहावी लागणार आहे. सध्यातरी कपिल शर्मा शो सुरू असून, प्रेक्षक त्याचा आनंद घेत आहेत.