ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कपिलला देखील काळ्या यादीत टाकू शकते एअर इंडिया

मुंबई, दि. २७ - शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांना एअर इंडियाने त्यांच्या कर्मचा-याला मारहाण केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकल्यानंतर आता या यादीत पुढचे नाव प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माचे असू शकते. एअर इंडियाच्या विमानाने अलीकडे ऑस्ट्रेलियाहून भारतात परतत असताना कपिल शर्माने विमानात गोंधळ घातला होता. या वर्तनाबद्दल एअर इंडियाकडून कपिलला इशारा देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
एअर इंडियाने विमानात बेशिस्त वर्तन करणारा प्रवासी व्हीव्हीआयपी असो किंवा सेलिब्रिटी त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेण्याचे ठरवले आहे. एअर इंडियाचे प्रमुख अश्वनी लोहानी यांनी कपिल शर्माच्या विमानातील वर्तनाचा अहवाल मागवला आहे. १६ मार्चला कपिलने त्याच्या टीमसह एअर इंडियाच्या मेलबर्न-दिल्ली विमानामधून प्रवास केला. त्याच्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट होते.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलचा आवाज मद्यपान केल्यानंतर चढला व त्याने आपल्याच सहका-यांसोबत वाद घातला. इकोनॉमी क्लासमध्ये बसलेल्या प्रवाशांपर्यंत कपिलचा आवाज ऐकू जात होता. बिझनेस क्लासमध्ये त्यावेळी कपिलची टीम आणि एक वयोवृद्ध महिला प्रवासी बसली होती.
केबिन क्रू सदस्यांनी कपिलचा गोंधळ वाढल्यानंतर हस्तक्षेप करुन कपिलचा राग शांत केला. कपिलने सुद्धा त्यावेळी माफी मागितली. पण त्यानंतर पुन्हा थोडयावेळाने कपिल आपल्या आसनावरुन उठला आणि आपल्या सहकलाकारांवर आरडाओरडा सुरु केला. अखेर वैमानिकाने हस्तक्षेप करुन कपिलला शांत रहाण्याचा इशारा दिला. त्यानंतर पुढच्या प्रवासात कपिलने कुठलाही वाद घातला नाही. भारतात येईपर्यंत तो झोपूनच होता असे सूत्रांनी सांगितले.