ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सुनील-अलीसोबत कलर्सचा नवा शो

मुंबई, दि. २९ - विनोदवीर सुनील ग्रोव्हरने ‘द कपिल शर्मा शो’मधून काढता पाय घेतल्याने कपिलच्या अडचणींत वाढ झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कपिल शर्माच्या शोला टफ फाइट देण्यासाठी कलर्स वाहिनी सुनील ग्रोव्हर आणि अली असगर यांना घेऊन नवीन शो लाँच करण्याचा विचारात आहे. यासाठी वाहिनीने सुनील आणि अली यांच्यासोबत बातचीत सुरु केली आहे.
वाहिनीच्या एका सुत्राने लीडिंग वेबसाइटसोबत केलेल्या बातचीतमध्ये सांगितले, की गेल्यावर्षी कलर्स वाहिनीसोबतच्या कपिलच्या वादानंतर वाहिनी त्याच्यावर नाराज होती. कपिलने त्याच्या वागणुकीविषयी अद्याप वाहिनीची माफी मागितलेली नाही. अशातच सुनील ग्रोव्हर आणि कपिल यांच्यातील वाद एवढा विकोपाला गेला, की आता अनेक कलाकारांनी त्याचा शो सोडला आहे. त्यामुळे आता त्याच कलाकारांच्या साथीने कलर्स वाहिनी नवीन शो लाँच करण्याच्या तयारी आहे. पण हा शो कधी सुरु होणार, हे अद्याप उघड करण्यात आलेले नाही.