ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जाणून घ्या एक एप्रिलपासून काय होणार महाग

नवी दिल्ली , दि. २९ - १ एप्रिलपासून आपल्या गरजेच्या आणि ऐशोरामाच्या वस्तू महाग होणार असून यात पान-मसाला, सिगारेट, चांदीच्या वस्तू, हार्डवेअर, स्लिव्हर फॉईल, चांदीचे आभूषणे, स्टीलचे सामान, आणि स्मार्टफोन यांचा महाग होणाऱ्या वस्तूंमध्ये समावेश आहे.
केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क वाढल्यानंतर तंबाखू असणाऱ्या पान-मसाला आणि गुटख्यावर उत्पादन शुल्क १० टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळे शौकीनांना आता है शौक महाग पडणार आहे. सिगारेटवर उत्पादन शुल्क २१५ रुपये प्रति हजारवरून वाढवून ३११ रुपये प्रति हजार होणार आहे. एक एप्रिलपासून हेल्थ आणि कार इन्शूरन्स महाग होणार आहे.
मोबाईल फोन तयार करण्यासाठी लागणारे प्रिटेड सर्किट बोर्डवर सीमा शुल्क लावण्यात येणार आहे. यापूर्वी सर्किट बोर्डवर सीमा शुल्क लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आता मोबाईल फोन महाग होणार आहेत. एलईडी ब्लब तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीवर सीमा शुल्क आणि ६ टक्के प्रतिपूर्ती शुल्क लावण्यात येणार आहे. त्यामुळे एलईडी बल्ब महाग होणार आहे.
अॅल्यूमिनियम ३० टक्के आयात शुल्क लावण्यात आला आहे. त्यामुळे या संदर्भात सर्व पदार्थ महाग होणार आहे. कार, मोटारसायकल आणि कमर्शियल वाहनांच्या विमा एक एप्रिलपासून महाग होणार आहे. यांच्या दरात ५० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
लेदर सामान, नैसर्गिक गॅस, निकल, बायोगॅस, नायलॉन, रेल्वे तिकीट खरेदी, स्वस्त घर, मध्यम वर्गाला टॅक्समध्ये सूट, भूमी अधिग्रहणाची नुकसान भरपाई टॅक्स फ्री, सौर उर्जा बॅटरी आणि पॅनल, पवन चक्की, आरओ, पॉईंट ऑफ सेल मशीन, पार्सल स्वस्त होणार आहे.