ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चॅनेलची कपिलला रविवारीची सुट्टी

मुंबई, दि. ३० - सुनील ग्रोवरसोबतच्या वादानंतर विनोदवीर कपिल शर्माचा कार्यक्रम अधांतरी झाल्याची चर्चा रंगत असताना या आठवड्यात कपिल शर्माच्या या कार्यक्रमाला सोनी टिव्हीने रविवारी सुट्टी दिली आहे. कपिल आठवड्यातून शनिवार आणि रविवार या दोन दिवशी ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र, या आठवड्यात कपिल फक्त शनिवारीच प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. दिवसेंदिवस सुनील ग्रोवरच्या वादाचे प्रकरण वेगळे वळण घेत असताना कपिल शर्माच्या शोला सोनीने कात्री लावली का? असा प्रश्न नक्कीच निर्माण होईल. मात्र, असे काहीही नसून, सोनी टिव्हीवर सध्या सुरु असणाऱ्या इंडियन आयडॉल या कार्यक्रमामुळे कपिलला सुट्टी देण्यात आल्याचे समजते.
रविवारी इंडियन आयडॉलच्या नवव्या पर्वातील फिनाले रंगणार असून, ८ वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत चालणार आहे. त्यामुळे कपिलचा शो रविवारी प्रसारित करण्यात येणार नाही. या वृत्ताबाबत सोनी टिव्ही किंवा कपिलने अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. सुनील ग्रोवरच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमाच्या टीआरपीवर परिणाम होत असल्याचे दिसते आहे. विमान प्रवासामध्ये कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यात वादाचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. कपिलसोबतच्या वादानंतर सुनील ग्रोवर दिल्लीत लाइव्ह कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.