ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नजरकैदेत बाहुबली

मुंबई, दि. ३० - बाहुबलीच्या मृत्यूचे गुढ एस. राजमौली यांच्या आगामी ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटातून उलगडणार असल्यामुळे प्रेक्षकांमधील या चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. पुढच्या महिन्यात एस. राजमौली यांचा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपट लीक होऊ नये, यासाठी चित्रपटाची टीम खास काळजी घेताना दिसत आहे. 
बाहुबली २ चे अंतिम एडिटिंग ज्या ठिकाणी करण्यात येत आहे, त्याठिकाणी मजबूत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पायरसी प्रकार रोखण्यासाठी याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून चित्रपटाच्या एडिटिंग रुममध्ये फक्त सात लोकांना जाण्याची परवानगी आहे. दिग्दर्शक एस. एस. राजमौली आणि निर्माता शोबू यांच्या व्यतिरिक्त केवळ पाच लोक याठिकाणी जाऊ शकतात. जर चित्रपटातील कलाकारांना कोणत्या कारणास्तव या ठिकाणी जाण्याची गरज पडली, तर कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना याठिकाणी प्रवेश दिला जातो.
दरम्यान नोव्हेंबरमध्ये या चित्रपटातील पाच मिनिटांचा युद्धभूमीवरील प्रसंग ऑनलाइन उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर देखील ऑनलाइन उपलब्ध झाला होता. या दोन घटनांची पुनरावृत्ती होऊन चित्रपटावर परिणाम होऊ नये, यासाठी निर्मात्यांनी बाहुबलीच्या अंतिम एडिटिंगवेळी सुरक्षा कवच निर्माण केले आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रटासंदर्भातील कोणत्याही सीनवर भाष्य करु नये, अशा सूचना देखील संबंधित कलाकारांना निर्माता आणि दिग्दर्शकांकडून मिळाल्या आहेत.