ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एप्रिल फूल- दुसर्‍यांना मूर्ख बनविण्याचा दिवस

आज १ एप्रिल. हा दिवस सर्व जगभर मूर्खांचा दिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी मारलेली कोणतीही थाप, बढाई, केलेली चेष्टा, झालेली फजिती मनाला लावून घ्यायची नाही तर त्यावर मुक्त हसायचे व आपण कसे मूर्ख बनलो किंवा दुसर्‍यांना कसे मूर्ख बनविले याच्या स्टोरीज मित्रमंडळीत सांगायच्या असा हा गमतीचा दिवस. हा दिवस मूर्खांचा दिवस म्हणून कधीपासून साजरा होऊ लागला याचे नक्की पुरावे देता येत नाहीत मात्र त्याच्याशी संबंधित अनेक कथा सांगितल्या जातात.
चॉस या लेखकाने लिहिलेल्या केंटरबरी टेल्स मध्ये अशी कथा आहे की १३ व्या शतकात इंग्लंडचा राजा रिचर्ड सेकंड व बोहेमियाची राजकुमारी अॅन यांचा साखरपुडा ठरला व त्याची तारीख ३२ मार्च १३८१ अशी जाहीर केली गेली. लोकांनीही या तारखेवर विश्वास ठेवला पण मार्चमध्ये ३२ ही तारीखच नाही हे कुणाच्याच लक्षात आले नाही. म्हणजेच एक प्रकारे ते मूर्ख ठरले. ३२ मार्च म्हणजे १ एप्रिल असा ही अर्थ त्यातून काढला गेला. थोडक्यात हे खूळ पश्चिमेकडून आपल्याकडे आले आहे.
दुसरी कथा अशी की पूर्वीच्या काळी जगभर भारतीय कॅलेंडर प्रमाण मानले जात होते. त्यामुळे नवीन वर्ष चैत्रात सुरू व्हायचे. चैत्राची सुरवात साधारण एप्रिलपासून होते. १५८२ साली पोप ग्रेगरी याने नवीन कॅलेंडर लागू केले व तेव्हापासून नवीन वर्षाची सुरवात १ जानेवारीपासून झाली. कांही जणांनी नवीन कॅलेंडर स्वीकारले तर कांही नाकारले. जे नवीन वर्षाची सुरवात एप्रिलपासून करत त्यांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले.