ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गोलमाल अगेनमध्ये मुन्नाभाईची एन्ट्री

मुंबई, दि. १ - ‘गोलमाल’ चित्रपटाच्या सीरिजमधील ‘गोलमाल अगेन’ प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला असून रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा, तब्बू, तुषार कपूर, अर्शद वारसी, अजय देवगण या कलाकरांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. एखाद्या कौटुंबिक समारंभात ज्याप्रमाणे घरातील मंडळी मोठ्या उत्साहात फोटोसाठी पोझ देतात अशीच पोझ या फोटोमध्ये या कलाकारांनी दिली आहे. पण, त्यांच्या या परफेक्ट फॅमिली फोटोमध्ये अभिनेता संजय दत्तची उपस्थिती अनेक प्रश्न उपस्थित करुन जात आहे. तब्बू आणि परिणीतीमध्ये बसलेल्या संजय दत्तने सध्या अनेकांचे लक्ष वेधले असून, तो या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.