ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सोनी चॅनेलकडून कपिल शर्माला एक महिन्याचा कालावधी

मुंबई, दि. ३ - द कपिल शर्मा शो हास्य अभिनेता सुनील ग्रोव्हरने सोडल्यानंतर कपिलच्या घराचे वासे फिरले असून कपिलच्या घरात घडणाऱ्या कोणत्याच गोष्टीने प्रेक्षकांना हसू येत नसल्यामुळे कपिलचा हा शो बंद होण्याच्या मार्गावर असून कपिल चांगलाच चिंतेत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे सोनी एंटरटेन्मेंट चॅनलने कपिलला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे.
सुनील ग्रोव्हरने या शोला कपिलबरोबर झालेल्या वादानंतर सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुगंधा मिश्रा यांनीही हा शो सोडल्याने कपिलच्या शोचा टीआरपी घसरला आहे. कपिलने राजू श्रीवास्तव सारख्या तगड्या विनोदी अभिनेत्यालाही शोमध्ये घेऊन पाहिले. पण बराच प्रयत्न करूनही एकाही विनोदावर प्रेक्षक हसले नाहीत. त्यामुळे कपिलला अवघ्या पंधरा मिनिटात चित्रीकरण गुंडाळावे लागले होते.
कपिलला सोनी इंटरटेन्मेंट चॅनेलने शो सोडून गेलेल्या सर्व कलाकारांना पुन्हा आणून हा शो पूर्वी सारखाच ट्रॅकवर आणण्यासाठी एक महिन्याची डेडलाइन दिली आहे. महिन्याभरात शो ट्रॅकवर आला नाही तर हा शो कायमचा बंद करण्यात येईल, असे फर्मानही त्याला बजावण्यात आले आहे. या महिन्यातच ‘द कपिल शर्मा शो’चे रिन्यूअल करण्यात येणार होते. त्यासाठी कपिल सोबत १०६ कोटी रूपयांची डिल करण्यात येणार होती. पण कपिल आणि सुनील ग्रोव्हरच्या वादाचा परिणाम शोवर झाल्याने ही बोलणीही फिस्कटल्याची चर्चा आहे.