ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कपिल शर्मा सुधारला तरी 'शो'मध्ये नाही परतणार - सुनिल

मुंबई, दि. ४ - मी दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला मात्र, काही उपयोग झाला नाही. सुनिल आता पुन्हा कपिलच्या शोमध्ये परतणार नाही असा खुलासा राजू श्रीवास्तवने केला आहे. त्यामुळे सुनिल ग्रोव्हर द कपिल शर्मा शोमध्ये परतणार असल्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहे.
आमची शुटींग सुरू होती तिथे जवळच सुनित. ल ग्रोव्हर इंडियन आयडलच्या सेटवर शूटींग करत होता. तेथे मी त्याची भेट घेतली होती. राजूभाई तुम्ही मला ओळखतात. मी खूप अहंकारी आहे किंवा प्रसिद्धीची हवा माझ्या डोक्यात गेलीये असं काही नाहीये. माझ्यासोबत जे झालं ते अत्यंत चुकीचं होतं. कपिल सुधारला तरी मी आता शोमध्ये परतणार नाही, सुनिलने म्हटल्याचं राजू श्रीवास्तवने सांगितलं. 
यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या कॉमेडियन कपिल शर्मानं आपला 'द कपिल शर्मा शो' बंद करावा लागेल, याचा स्वप्नातही कधी विचार केला नसावा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  एप्रिल महिन्यात या शोचा नव्याने करार होणार होता. १०६ कोटी रुपयांपर्यंत याचा करारदेखील करण्यात आला होता. मात्र, कपिल शर्मा-सुनिल ग्रोव्हरच्या वादामुळे हा करार वादात सापडणार असल्याचे चित्र आहे.   
 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्यासाठी चॅनेलकडून कपिलला एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.  कपिल शर्मा आणि कार्यक्रमातील अन्य सह कलाकारांसाठी ही शेवटची संधी असल्याचंही बोलले जात आहे.  जर या संधीचं त्यांनी सोनं केलं तर चॅनेल हा शो पुढे चालवण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. तसं न झाल्यास शो बंद होण्याची टांगती तलवार कपिलवर आहे. 
 सध्या शोचा टीआरपी पाहता, कपिलसाठी सुनील ग्रोव्हर, चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुगंधा मिश्रा यांच्याशिवाय शोमध्ये कॉमेडी करणं कठीण झालं आहे. दरम्यान, ही सर्व मंडळी शोमध्ये पुन्हा सहभागी होण्याच्या मनस्थितीतही नाहीत. यामुळे शो बंद करण्याशिवाय चॅनेलकडे दुसरा पर्यायही नाही, अशी माहिती आहे.
 सुनील ग्रोव्हरसहीत दुस-या सह कलाकारांनी शो सोडल्यापासून आतापर्यंत दोन एपिसोड झालेत. मात्र या दोन्ही एपिसोडचा टीआरपी जबरदस्त घसरला आहे. दरम्यान सुनील ग्रोव्हर व अन्य कलाकारांच्या अनुपस्थितीत शो खेचण्याचा पुरेपुर प्रयत्न कपिल शर्मा करत आहे. मात्र त्याला प्रेक्षकांना हसवण्यात हवं तसे यश मिळताना दिसत नाही. कपिलने शोमध्ये राजू श्रीवास्तव,  सुनील पाल आणि अहसान कुरेश यांना घेतलं आहे. मात्र यातही त्याला फारसं यश मिळालेलं नाही.