ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अभिनेत्री राखी सावंतला पंजाब पोलिसांकडून अटक

मुंबई, दि. ४ - अभिनेत्री राखी सावंतला पंजाब पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे. रामायकार वाल्मिकींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
लुधियानाच्या न्यायालयाने राखी सावंतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यानंतर पोलिसांचं एक पथक राखी सावंतला अटक करण्यासाठी लुधियानाहून मुंबईला आलं होतं. मागील वर्षी राखी सावंतने वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती. या टिप्पणीमुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, तिच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर लुधियाना न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही ती न्यायालयात हजर न राहिल्याने तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं.