ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अभिनेता रितेश देशमुखला अटक

पोलिसांनी बॉलिवूडचालई भारीअभिनेता रितेश देशमुखला बेड्या ठोकून ताब्यात घेतल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून रितेशला कोणत्या आरोपाखाली अटक झाली आहे, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच भेडसावत असेल पण तुमचे तर्कवितर्क लावण्याआधी जरा थांबा. रितेश आपला आगामीबँक चोरचित्रपटाचे प्रमोशन करत असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे एक पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले होते.

या चित्रपटात त्याच्यासोबत विवेक ओबेरॉयदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे हटके प्रमोशन करण्याचे या दोघांनी ठरवले असून त्यानुसार अगदी एखाद्या -या गुन्हेगाराला अटक करतात त्याचप्रमाणे रितेशला पोलीस ताब्यात घेऊन जात आहेत. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या बँक चोर या रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि रिया चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात रितेश देवावर विश्वास असलेल्या एका मराठी तरुणाच्या भूमिकेत असून, बँकेचे कर्ज फेडू शकल्याने मित्रांच्या मदतीने बँक लुटण्याची योजना तो बनवतो.

दुसरीकडे विवेक ओबेरॉय वर्षभरानंतर चित्रपटात दिसणार असून तो एका सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. रितेशने सांगितले की, त्याने लहानपणी स्केच पेन चोरले होते, तसेच शाळेमध्ये मित्रांचा डबा चोरून तो खात असे. विनोदी आणि रोमांचक कथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन बम्पी यांनी केले आहे. हा चित्रपट 16 जूनला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.