ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

परशाचा नवा सिनेमा, सलमानकडून फर्स्ट लूक रिलीज

मुंबई : सैराटफेम आकाश ठोसरच्या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा दबंग अर्थात सुपरस्टार सलमान खानने या सिनेमाचा फर्स्ट लूक ट्वीट केला आहे. एफयू असे या सिनेमाचे नाव आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांचा हा सिनेमा असून, सैराटमध्ये परशा ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आकाश ठोसरचीएफयूमध्येही मुख्य भूमिका असणार आहे. 2 जून रोजी आकाशचा हा नवा सिनेमा रिलीज होणार आहे.

अभिनेता आकाश ठोसरच्या सैराटमधील भूमिकेमुळे त्याच्या पुढच्या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर महेश मांजरेकरांच्याएफयूमधून आकाश प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शितसैराटमधून आकाश ठोसर महाराष्ट्रासह देशभर पोहोचला. मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडनेही सैराट आणि त्यातील कलाकारांचं भरभरुन कौतुक केलं होतं.

दरम्यान, सलमान खान आणि महेश मांजरेकर यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. याच मैत्रीखातर सलमान खानने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुनएफयूचं पोस्टर रिलीज केलं आहे.

वेगवेगळे विषय घेऊन सिनेमे करणारे निर्माते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांची स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. तर दुसरीकडे आकाश ठोसरने आतापर्यंत फक्त एकाच सिनेमात म्हणजेसैराटमध्येच काम केलं आहे. त्यामुळे महेश मांजरेकर आकाशला कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आणणार आहेत, याची सिनेरसिकांसह चित्रपटसृष्टीलाही उत्सुकता लागली आहे.