ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कमरेखालचा विनोद सिद्धूंना भोवला

मुंबई, दि. १० - सुनील ग्रोव्हरसोबतचा वाद, घसरलेला टीआरपी, चॅनेलने दिलेले अल्टिमेटम यामुळे कॉमेडी किंग कपिल शर्माच्या कपिल शर्मा शोच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ अद्याप कायम आहे. त्यात आता शोमधील महत्त्वाचा चेहरा असलेले नवज्योतसिंह सिद्धू वादात सापडले आहेत.

द्विअर्थी विनोद पंजाबचे कॅबनेट मंत्री असलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांनी केल्याचा आरोप आहे. सिद्धूंनी अश्लिल आणि द्विअर्थी विनोद केल्याने, वरिष्ठ वकील एचसी अरोडा यांनी पंजाबच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. कपिलचा शो पत्नी आणि मुलीसोबत पाहात होतो. त्यावेळी सिद्धूंच्या आक्षेपार्ह विनोदामुळे भावना दुखावल्या, असे अरोडा यांनी म्हटले आहे. अरोडा यांच्या तक्रार अर्जात शोमधील काही विनोदांचा उल्लेख केला आहे. हे विनोद अभद्र आणि द्विअर्थी असल्याचा त्यांचा दावा आहे.

त्याचबरोबर अरोडा यांनी पंजाब सरकारला मंत्रिपद आणि आचारसंहितेची आठवण करुन दिली. तसेच हे प्रकरण पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यापर्यंत पोहोचवण्याचीही मागणी केली आहे. सिद्धूने माहिती आणि प्रसारण कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा अरोडा यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी उच्च न्यायालयातही जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, अरोरा यांचे आरोप सिद्धूंनी फेटाळले आहेत. जर या शोमध्ये अश्लिलता असती, तर हा शो लोकप्रियतेमध्ये अव्वल नसता, असे सिद्धूंनी म्हटले आहे. त्याचबरोबर लोक फळ लागलेल्या झाडाला दगड मारतातच, असाही टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, एच सी अरोरा यांनी मंत्री असलेल्या सिद्धू यांच्या शोमधील सहभागावरच आक्षेप घेतला आहे. त्याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी गेल्या आठवड्यात सुनावणी झाली, त्यावेळी हे मंत्र्यांच्या नैतिकतेचे उल्लंघन नाही का? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला होता. तसेच पंजाब सरकारला नोटीसही पाठवली होती. याप्रकरणी पुढील सुनावणी ११ मे रोजी होणार आहे.