ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कपिलच्या एक्स गर्लफ्रेन्डचा सुनीलसोबत शो

मुंबई, दि. ११ - सुनील ग्रोवरसोबतच्या वादाचा सर्वात जास्त फटका कपिल शर्माला बसला आहे. एकतर त्याची इमेज डाऊन झाली आणि दुसरे म्हणजे कपिलचे जवळचे लोकच आता त्याच्यापासून दूर जात आहेत. कपिल शर्माच्या शोचा टीआरपी सुद्धा घटल्याने सोनी टिव्ही हा शो बंद करणार असल्याचीही चर्चा होत आहे. अशातच आता कपिल शर्माचे वाईट दिवस सुरु होताच त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने देखील त्याच्याशी बदला घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

सुनील ग्रोवरसोबत एक नवा शो कपिल शर्माची एक्स गर्लफ्रेंड प्रीती सिमोजने प्लान केला आहे. सुनील ग्रोवर एका वेगळ्या कॉन्सेप्टवर नवा टीव्ही शो प्लान करताना दिसत आहे. त्यामुळे कपिलची चांगलीच वाट लागणार आहे. कारण या संपूर्ण प्रकरणात सुनील ग्रोव्हरला जास्त सहानुभूती मिळाली आहे तर कपिलवर जोरदार टीका झाली आहे.

सोनी टीव्हीला सुनीलने त्याचा शो सबमिट केला आहे. या टीव्ही शोला सोनी टीव्हीने मंजुरी देखील दिली आहे. कपिल पेक्षा त्याचा वेगळा वेळ सुद्धा मिळाला आहे. जूनपासून कपिलच्या शो सोबत सुनील ग्रोवरचा हा शो येऊ शकतो. चॅनेलने कपिलला एका महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे कपिल शर्मा शो सोनी टीव्ही वरुन गुंडाळला जाऊ शकतो. तसेही कपिल शर्मा त्याच्या आगामी फिरंगी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त होणार आहे.

जेव्हा सुनील ग्रोवरच्या नव्या शोबाबत प्रीती सिमोजला विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, मी अशा कोणत्याही गोष्टीचा भाग नाही आहे. पण मी कपिलचा शो सोडला आहे. सुनील ग्रोवरसोबत वाद झाल्यानंतर कपिल शर्मा शोचा सेट रिकामा दिसत आहे. चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुगंधा मिश्राने यांनी देखील शोवर बायकॉट केला आहे.