ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सचिन अ बिलियन ड्रीमचे पोस्टर रिलीज

मुंबई, दि. १३ - प्रत्येक क्रिकेटरच्या स्वप्नातील सचिन तेंडूलकरचा प्रवाससचिन बिलियन ड्रीमया त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार असून प्रत्येक क्रिकेट रसिकाला त्याच्या या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली असताना खुद्द सचिनने ट्विटरवरुन ट्रेलरपूर्वी चित्रपटाचे आणखी एक पोस्टर शेअर केले आहे.

सचिनने चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना या चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख आणि वेळेचा देखील उल्लेख ट्विटमध्ये केला आहे. सचिनने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन दिलेल्या माहितीनुसार, आजसचिन बिलियन ड्रीमचित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. नेटीझन्सना सायंकाळी वाजता सचिनची इनिंग पडद्यावर कशी दिसणार याची पहिली झलक पाहता येईल. चित्रपटापूर्वी सचिनप्लेइंग विथ माय वेया आत्मचरित्राच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचला होता. त्याच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाच्या गोष्टी पुस्तकाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर देखील त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाबद्दल तमाम भारतीयांमध्ये उत्सुकता दिसून येते.

जेम्स अर्सकाईन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारितसचिन बिलियन ड्रीमया चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा चित्रपट २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.