ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मस्त मस्त गर्ल चला हवा येऊ द्याच्या मंचावर

मुंबई, दि. १४ - बॉलिवडची मस्त गर्ल अशी ओळख असणारी रविना टंडन आता हिंदी चित्रपटात पुनरागमन करत असून लवकरच तिचामातृहा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे. रविनाने या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली. हा भाग येत्या मंगळवारी १८ एप्रिलला रात्री .३० वा. प्रसारित होणार आहे. तर सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिकाचूकभूल द्यावी घ्यावीमालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत.

आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवुड मंडळींनीचला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली आणि याच मंचावर आता मस्त मस्त गर्ल रविनासुद्धा येणार आहे. रविनाने अतिशय संवेदनशील अशा विषयावर आधारितमातृया चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी थुकरटवाडीची वाट धरली यावेळी तिच्यासोबत या चित्रपटात काम केलेली मराठमोळी अभिनेत्री दिव्या जगदाळेसुद्धा उपस्थित होती. यावेळी रविनासोबत थुकरटवाडीच्या मंडळींनी एकच धम्माल उडवून दिली आणि या सर्वाला तिने खळखळून दादही दिली आणि कुशल बद्रिके आणि भाऊ कदमसह काही गाण्यांवर नृत्याचा ठेकाही धरला. तर पोस्टमन काका बनून आलेल्या सागर कारंडेच्या पत्राने तिच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या. एकंदरीत धम्माल मजा मस्तीसोबतच एका संवेदनशिल विषयावर प्रकाश टाकणारा हा भाग येत्या मंगळवारी रात्री .३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.