ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेजाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला मुन्नाभाईचा जीवनपट

मुंबई, दि. १५ - बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला बायोपिक चित्रपटांचे वारे वाहत असून आता यात अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर येणाऱ्या बायोपिकचीही चर्चा सध्या सिनेवर्तुळात रंगली आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता रणबीर कपूर संजूबाबाच्या बायोपिक पूर्ण न्याय मिळावा यासाठी काहीच कसर बाकी ठेवत नसल्याचे दिसत आहे.

रणबीरचे संजूबाबाच्या लूकमधील काही दिवसांपूर्वीच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये रणबीर हुबेहुब संजय दत्तसारखाच दिसत होता. दरम्यान, रणबीरच्या लूकची सर्वांकडून प्रशंसा केली जात असतानाच या चित्रपटाचे चित्रीकरण मात्र लोकांसाठी डोकेदुखीचे कारण बनले आहे.

संजूबाबाच्या शेजाऱ्यांनादत्त बायोपिकसाठी काम करत असलेल्या टीममुळे बराच त्रास सहन करावा लागला. संजय दत्तचे घर पाली हिल येथील इम्पेरिअल हाइट्स येथे असून चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम तेथे पोहचली होती. चित्रीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाल्याने त्याठिकाणी बराच गोंधळ झाला.

याबाबत पाली हिल रेसिडेन्ट्स असोसिएशनचे सचिव मधू पोपलई यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तच्या घराबाहेर रणबीर फेरारी चालवत असल्याचे दृश्य चित्रीत करण्यात येणार होते. हा सीन वगळता बाकीचे चित्रीकरण त्याच्या घरात होणे अपेक्षित होते. सकाळी सहाच्या सुमारास सुरु झालेले चित्रीकरण जवळपास तीन तास सुरु होते. तोपर्यंत लोकांची कामाला जाण्याची वेळ झाली होती. पण, चित्रपटाची टीम रस्त्याच्या मध्येच चित्रीकरण करत असल्यामुळे लोकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्यामुळे लोकांना राग येणेही स्वाभाविक होते.

संपूर्ण युनिटने पेपर प्लेट्स, चहाचे कप आणि इतर कचरा टाकून सर्व परिसर खराब केला. चित्रपटाच्या युनिटने चित्रीकरणासाठी आमच्याकडून परवानगीदेखील घेतली नव्हती, असेही पोपलई म्हणाले. पण याबाबत चित्रपटाच्या युनिटने मात्र काही वेगळीच माहिती दिली आहे. पाली हिल परिसरात थोडासा गोंधळ झाला होता. पण, हिरानी यांनी स्वतः जाऊन माफी मागितली होती. तसेच, चित्रीकरणानंतर परिसरातील सर्व कचरा उचलून तो योग्य त्या ठिकाणी फेकला जाईल याचीही काळजी Posted On: 15 April 2017