ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सलमानच्या आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटाचा प्रोमो लाँच

मुंबई, दि. १९ - अभिनेता सलमान खान नव्या चित्रपटाच्या रुपात दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर चाहत्यांना ईदी देतो. त्यामुळे सलमानचे चाहते ईदची आतुरतेने वाट पाहात असतात. दिग्दर्शक कबीर खानने याचाच अंदाज घेत सलमानच्या आगामीट्युबलाइटचित्रपटाचा प्रोमो लाँच केला आहे.

ट्युबलाइटसाठी हे सर्व आजपासून सुरु होत आहे, असे म्हणत कबीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले. त्यासोबतच त्याने दुसऱ्या ट्विटमध्येईद मनाओ ट्युबलाइट के साथअसे म्हणत सर्वांचेच लक्ष वेधले. कबीर खान दिग्दर्शितट्युबलाइटचा प्रोमो पाहता त्यामध्ये बऱ्याच लहान मुलांचा आवाज येतो आहे. मुख्य म्हणजे ती सर्व लहान मुले सलमानच्याच गॅलेक्सी अपार्टमेंटमधील असून, तेजल जा, जल जाअसे म्हणत आहेत. एखादा दिवा (बल्ब) जाताना ज्याप्रमाणे प्रकाश पडतो त्याचप्रमाणे दिव्याच्या उघडझापाची संकल्पना १४ सेकंदांच्या या प्रोमोमध्ये पाहायला मिळते. लहान मुलांच्या आवाजाचा वापर या प्रोमोमध्ये करण्याची कल्पना सलमानचीच असल्यामुळे या प्रोमोसाठी ही एक वेगळी युक्ती लढवण्यात आली आणि त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील ते ११ वर्षे वयोगटातील मुलांचा आवाज ध्वनिमुद्रित करण्यात आला.