ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अजान ऐकून सलमानने थांबवली पत्रकार परिषद

मुंबई, दि. २० - मंदिर, मशिद आणि गुरुद्वारांमध्ये लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरवर गायक सोनू निगमने १७ एप्रिलला ट्विट करुन प्रश्न उपस्थित केले होते. त्याने ट्विटरवरुन मी मुस्लिम नाही तरी मला अजानच्या आवाजाने माझी झोपमोड होते. ही जबरदस्तीने लादण्यात आलेली धार्मिकता कधी थांबणार?’ असा प्रश्न विचारला होता. यावेळी फक्त मशिदीचाच उल्लेख सोनूने केला असे नाही, तर इतर धर्माबद्दलही त्याचे हेच म्हणणे आहे. पण, यूट्यूबवर याचसंदर्भातला असा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे, ज्यात बॉलिवूडच्यादबंगने अर्थात सलमानने अजानचा आवाज ऐकू येताच पत्रकार परिषद थांबवली होती.

एक पत्रकार परिषदबिग बॉस या रिअॅलिटी शोसाठी घेण्यात आली होती. चॅनेलचे एक अधिकारी सलमानसोबत स्टेजवरुन पत्रकारांशी संवाद साधत असताना अजान सुरू झाली. अजानचा आवाज ऐकताच सलमानने त्या अधिकाऱ्याला शांत राहायला सांगितले. यानंतर ते दोघेही खूप वेळ स्टेजवर अजान संपण्याची वाट बघत उभे असताना दिसले. जशी अजान संपली तशी पत्रकार परिषदेला पुन्हा सुरूवात झाली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.