ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आगामी चित्रपटासाठी करिना घेणार ६ कोटी मानधन

मुंबई, दि. २० - सध्या बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरच्या आयुष्यात सुखाचा काळ सुरु असून तिच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक आऩंदाच्या घटना घडत आहेत. करिनाला आता एका बडया बॅनरचा चित्रपट मिळाल्याची चर्चा असून या प्रोजेक्टसाठी करिनाला रग्गड मानधन मिळणार असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

अद्याप करीनाच्या या नव्या चित्रपटाचे नाव किंवा कथानक काहीही निश्चित झालेले नाही. पण जो रोल करीनाला ऑफर केला गेला आहे त्या रोलसाठी ती प्रचंड उत्सुक असून, या चित्रपटासाठी तिला तब्बल सहा कोटी रुपयांचे मानधन मिळणार असल्याची चर्चा आहे. सध्या वजन कमी करण्यासाठी करिना प्रचंड मेहनत घेत आहे. आगामीवीरे दी वेडिंगचित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याआधी करिनाने पूर्वीसारखे स्लीम आणि फिट होण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

करिनाने गर्भवती राहिल्यानंतर चित्रपटात काम करणे पूर्णपणे थांबवले होते. आता पुन्हा एकदा झोकात पुनरागमन करण्यासाठी करिना सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. आजच्या जमान्यात लग्न, मुलबाळ झाल्यानंतरही निर्माते अभिनेत्रींच्या दारात रांगा लावतात. करीनामध्ये सौदर्य आणि अभिनय दोघांचा मिलाफ असल्यामुळे चाहते तिला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.