ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जॉन घेऊन येत आहे सविता दामोदर परांजपे

मुंबई, दि. २१ - अभिनेता जॉन अब्राहमने बॉलिवूडमध्ये २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्याविकी डोनरया चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन संदेश देत चित्रपट निर्मिती क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केले. जॉनने आजवर दमदार कथानकांच्या चित्रपटांना प्राधान्य देत त्याच्याजेएनिर्मितीअंतर्गत मद्रास कॅफे, रॉकी हॅण्डसम आणि फोर्स यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करणारा जॉन आता मराठी चित्रपटसृष्टीकडेही वळला असून जॉनसविता दामोदर परांजपेया चित्रपटाची निर्मिती करत आहे.

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर आता जॉनने मराठी चित्रपटसृष्टीत उडी घेतली आहे. आतासविता दामोदर परांजपेया चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून त्याची माहिती स्वतः जॉननेच ट्विटरवरून दिली. सेटवरील एक फोटो शेअर करत, ‘जेए एण्टरटेन्मेन्ट्स मराठी फिल्मच्यासविता दामोदर परांजपेचित्रपटाच्या सेटवरील पहिला दिवसमी या चित्रपटाच्या कथेच्या प्रेमात पडलो आहे. अखेर मला चित्रपट निर्मिती करण्याची संधी मिळाली,’ असे त्याने ट्विटरवर लिहिले. या थ्रिलरपटाची कथा दगा देणाऱ्या पुरुषाचा एक महिला कशाप्रकारे सूड घेते यावर आधारित असूनफुगेचित्रपटाची दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जॉनच्यासविता दामोदर परांजपेया मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. अभिनेता सुबोध भावे आणि राकेश बापट यात मुख्य भूमिका साकारताना दिसतील.