ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हाजी मस्तानची भूमिका साकारणार का रजनीकांत

मुंबई, दि. २२ - दिग्दर्शक रणजीथच्या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा गँगस्टरच्या भूमिकेत सुपरस्टार रजनीकांत हे झळकणार असल्याची चर्चा सध्या सिनेवर्तुळात सुरु असून त्यांची यावेळची भूमिका एका खऱ्या गँगस्टरवर आधारित आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गँगस्टर हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा आधारित आहे.

हाजी मस्तान, बावा आणि सुलतान मिर्झा या नावांनी मस्तान हैदर मिर्झा हा गँगस्टर प्रामुख्याने प्रसिद्ध होता. आठ वर्षांचा असताना तमिळ मुस्लिम असलेला हाजी मस्तान त्याच्या वडिलांसह मुंबईत स्थलांतरित झाला होता. अतिशय अस्खलितपणे तमिळ तो बोलायचा. त्याला मुंबईत स्मगलिंग आणि रिअल इस्टेट व्यवसायात तरबेज असलेल्या गँगस्टर करिम लाला आणि वरदराजन मुदलियारची साथ मिळाली. मुंबईतील गरिबांसाठी कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार असलेला हाजी मस्तान हा एक सेलिब्रिटी होता. अंडरवर्ल्ड जगतात त्याने जवळपास २० वर्षे वर्चस्व गाजवले होते. तसेच, तो दाऊद इब्राहिमचा गुरुदेखील होता.

रजनीकांत हे आता येऊ घातलेल्या हाजी मस्तानवरील नव्या चित्रपटात भूमिका साकारणार की नाही याबद्दलचे कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेले नाही. रजनीकांत यांनीबाशानंतर जवळपास दोन दशकानंतर गेल्यावर्षी आलेल्याकबालीचित्रपटात गँगस्टरची भूमिका साकारली होती.

दरम्यान, पुढच्या महिन्यात हाजी मस्तानवरील चित्रपटाचे काम सुरु होणार असल्याचे कळते. दिग्दर्शकाने अद्याप चित्रपटातील सर्व कलाकारांची नावे जाहीर केली नसली तरी अभिनेत्री विद्या बालन यात प्रमुख भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.