ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अभिनेत्री प्रीती जैनला तीन वर्षांची शिक्षा

मुंबई, दि. २८ - अभिनेत्री प्रिती जैन आणि अन्य दोघांना न्यायालयाकडून बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी शुक्रवारी दोषी ठरविण्यात आले असून मधुर भांडारकरला २००५ साली प्रीती जैन हिने जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप होता. तिच्यावरील हा आरोप सिद्ध झाला असून न्यायालयाने तिला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य दोन जणांची यावेळी न्यायालयाने निर्दोष मुक्तताही केली.

सरकारी पक्षाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, अरूण गवळीचा सहकारी नरेश परदेशी याला सप्टेंबर २००५ मध्ये मधुर भांडारकर याला जीवे मारण्यासाठी प्रीती जैन हिने सुपारी दिली होती. तिने वर्षभरापूर्वी मधुर भांडारकर याने बलात्कार केल्याचाही आरोप केला होता. नरेश परदेशीला प्रीती जैन हिने यासाठी ७५ हजार रूपयांची सुपारी दिली होती. मात्र, नरेशने कामगिरी पूर्ण केल्यामुळे प्रीतीने त्याच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. ही गोष्ट अरूण गवळीला समजल्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती आणि हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी आठवडाभराच्या चौकशीनंतर १० सप्टेंबर २००५ रोजी प्रीती जैनविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांनी प्रीती आणि नरेश परदेशीचा मित्र शिवराम दास याला अटक केली होती. सुरूवातीला शिवडी येथील जलदगती न्यायालयात हा खटला सुरू होता. त्यानंतर हा खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता.