ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बाहुबलीनंतर रितेशचा भव्यदिव्य शिवाजी - राम गोपाल वर्मा

मुंबई, दि. ११ - बाहुबली सध्या सर्व विक्रम मोडत असतानाच मराठी सिनेविश्वातून एक जबरदस्त बातमी आली आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी आपल्या ट्विटमध्ये रितेश देशमुखचा उल्लेख करत रितेश शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवत असल्याचं आपण ऐकल्याचं म्हटलं आहे. या सिनेमाचं बजेट २२५ कोटींहून जास्त असल्याचंही राम गोपाल वर्मांनी लिहिलंय. आपल्या ट्विटमध्ये रितेशचं कौतुकही त्यांनी केलं आहे. दरम्यान गेले आठवडे बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणाऱ्या बाहुबली चं बजेट तब्बल ५०० कोटी होतं. मात्र मराठीत २५० कोटी बजेट असणारा शिवाजी हा पहिलाच सिनेमा आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे स्वत: रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रवी जाधव याचं दिग्दर्शन करणार आहेत. शिवाजी महाराजांची कहाणी बाहुबलीपेक्षा सरस आणि वास्तववादी आहे. त्यामुळे ती प्रेक्षकांना वेगळाच आनंद देईल. शिवाजी महाराज भारताचे शूरवीर सुपुत्र आहेत, ज्यांनी परकीय आक्रमणं परतवून लावत स्वराज्य स्थापन केलंशिवाजी महाराजांच्या कहाणीमध्ये बाहुबलीपेक्षाही सांगण्यासारख्या खूप गोष्टी असून ती सत्यकथा आहे. त्यामुळे तो एक जबरदस्त अनुभव असेल असंही रामगोपाल वर्मांनी म्हटलं आहे.

त्यामुळे रितेशच्या सिनेमातील युद्धाचे सीन खूप भव्यदिव्य असतील Posted On: 11 May 2017