ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

फक्त बिग बींसाठीच सरकार ३

मुंबई, दि. १२ - आज बॉक्स ऑफिसवर रामगोपाल वर्मा दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन अभिनित सरकार सिरीजमधील तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे. रामगोपाल वर्माने तिसऱ्यांदा मुंबईमधील सरकारचे विश्व उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कसा आहे हा चित्रपट चला जाणून घेऊया.

सुभाष नागरे उर्फ सरकार (अमिताभ बच्चन ) आणि त्याच्या कुटुंबाच्या भोवताली असलेल्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर चित्रपटाची कथा आधारित असून सुभाष नागरेचा नातू चिकू उर्फ शिवजी नागरे (अमित साद) गावातून त्याच्या आजोबाकडे मुंबईत येतो. पण सुभाष नागरेंचा खास असलेल्या गोकुळ (रोनित रॉय) वर त्याच्या येण्याचा चांगलाच परिणाम होतो. सोबतच कथा अनु (यामी गौतम) च्या उपस्थितीनेही अधिक रंजक बनते. तिच्या वडिलांच्या मारेकऱ्याचा शोध तिला घ्यायचा असतो. देशपांडे (मनोज वाजपेयी) चीही कथेत महत्त्वाची भूमिका आहे. तसेच सरकारला उध्वस्त करण्याचा पूर्ण प्रयत्न बिझनेसमन मायकल वाल्या (जॅकी श्रॉफ) ही करतो. पण या कथेचा शेवट काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल.

चित्रपटाचे दिग्दर्शन, लोकेशन्स आणि कॅमेरा वर्कही कमालीचे असून विशेषतः शूट करण्याची पद्धत आणि कॅमेऱ्याचे अॅँगल उत्कृष्ट आहेत. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान बहुतांश ठिकाणी हे रिअल ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अगदी नेहमीसारखीच चित्रपटाची कथा हे. तिचा सहज अंदाज येऊ शकतो. मात्र कथेवर अधिक काम केले असते तर, त्याचा दर्जा सुधारता आला असता. स्क्रीनप्ले एवढ्या चांगल्या स्टारकास्टचा वापर करण्यासाठी अधिक चांगला करता आला असता. काही विचित्र किंवा खटकणाऱ्या बाबीही चित्रपटात आहेत. त्यात जॅकी श्रॉफ आणि त्याचे वेडे प्रेम, अमिताभ बच्चन आणि त्याची चहा प्यायची पद्धत, स्पेशल अपिअरन्समध्ये सारखा झळकणारा अभिषेक बच्चन, मराठी राजकारण्याचा मुलगा असलेल्या अमित सादचे अचानक पंजाबी टोनमध्ये बोलणे. यामी गौतमपेक्षा जास्त संवाद जॅकी श्रॉफची गर्लफ्रेंड म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्रीचे आहेत. चित्रपटाच्या एकाही सीनचा संबंध पुढच्या सीनबरोबर लागत नाही. मोठे मोठे सिक्वेन्स काही काळानंतर बोलायला लाग