ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कटप्पात अडकले ट्विंकलचे मन

मुंबई, दि. १७ - बॉलीवूड अभिनेता खिलाडी अक्षयकुमार सध्या यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करत आहे. त्याचे पत्नी ट्विंकल व मुलांसोबतचे वैवाहिक जीवनही अतिशय सुखसमाधानाने चालले असतानाच ट्विंकलच्या मनावर मात्र दुसरेच कोणी मोहिनी घालते आहे व याची कबुली खुद्द ट्विंकलनेच ट्विटरवरून दिली आहे. सध्या बाहुबली दोनने जगभरातील प्रेक्षकांना स्वतःच्या आकर्षणात खेचले असताना ट्विंकलचे मन मात्र कटप्पावर गेले आहे. बाहुबली दोन पाहून आल्यापासून ती कटप्पाची दिवानी बनली आहे व तिने कटप्पाचा मुलगा सिबीराज याला ट्रॅक करून बाहुबली व बाहुबली दोनच्या यशासाठी कटप्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच काय हल्ली ती तिच्या मुलीलाही कटप्पा याच नावाने हाक मारत आहे असेही समजते.