ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दंगलची भारतापेक्षा चीनमध्ये छप्पर फाड कमाई

चीनमध्ये अभिनेता आमीर खानच्यादंगलचित्रपटाने अक्षरश: पैशांचा पाऊस पाडला असून या चित्रपटाने चीनमध्ये केवळ तीन आठवड्यात तब्बल ७२५ कोटींची कमाई केली आहे. ‘दंगलने केलेली ही कमाई चिनी बॉक्स ऑफिसवरची आतापर्यंतची दुसऱ्या क्रमांकाची कमाई आहे.

भारतीय बॉक्स ऑफिसपेक्षा चीनच्या बॉक्स ऑफिवरदंगलने जास्त कमाई केली आहे. दंगलने भारतात ३८७.३८ कोटी रुपये कमावले. आकड्यांचा हिशेब करायचा झाल्यासदंगलने जगभरात एकूण १५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चिनी भाषेत डबिंग करुन नऊ हजार स्क्रिनमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. चीनमध्ये हा चित्रपट Shuai jiao baba नावाने प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिसऱ्या रविवारी ७३ कोटी रुपये कमावले. तर केवळ आठ दिवसात या चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला होता. याआधी चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आमीरचाच होता. आमीर खान आणि अनुष्का शर्माच्यापीकेचित्रपटाने १४० कोटी मिळवले होते.

दुसरीकडे बॉक्स ऑफिसवरबाहुबली आणिदंगलमध्ये कमाईचे युद्ध पाहायला मिळत आहे. जगभरात १५३८ कोटी रुपयांची कमाई करणाराबाहुबली हा भारताचा पहिला चित्रपट ठरला आहे. तरदंगलही १५०१ कोटी रुपयांची कमाई करत, ‘बाहुबली ला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. कमाईच्या बाबतीतबाहुबली पेक्षादंगलकेवळ ३७ कोटींने मागे आहे.