ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नच बलियेमध्ये सिद्धार्थ जाधवची वाइल्ड कार्ड एंट्री

मुंबई, दि. २३ - नच बलियेया डान्स रियालिटी शोच्या व्या सीझनमध्ये आपला सिद्धार्थ जाधव त्याची पत्नी तृप्तीबरोबर कार्यक्रमाचा हिस्सा होता. त्यांना शोमधून अप्रतिम परफॉर्मन्स देऊनही केवळ मते कमी पडल्यामुळे बाहेर पडावे लागले होते. शेवटच्या परफॉर्मन्सला फुल मार्क्स मिळूनही बाहेर पडावे लागल्यामुळे सिद्धू आणि तृप्ती हिरमुसले होते. त्यांचा तो परफॉर्मन्स एवढा सुंदर झाला होता की सोशल मीडियावर त्याला वीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. परंतु सिद्धार्थला नुकतीच एक गुड न्यूज मिळाली आहे.

त्याची आणि तृप्तीचीनच बलियेमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. ‘देवा श्री गणेशा….’ गाण्यावर त्यांनी नाचत इतरांवर मात करीत परीक्षकांची वाहवा मिळवत पुन्हा मानाने स्पर्धेत उडी घेतली आहे. नारिंगी रंगातील ड्रेसमधील नृत्यही अप्रतिम झाले त्यामुळे सिद्धू जाम खुशीत आहे. परंतु त्यालाही मनोमन माहित आहे की मते मिळवणेही खूप गरजेचे आहे. मराठी मनोरंजन इंडस्ट्रीने तो शोमधून बाहेर पडल्यावर हळहळ व्यक्त केली आणि त्याला वचन दिले आहे की आता अख्खी इंडस्ट्री त्याच्या पाठी उभी राहील.