ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अभिजीतच्या समर्थनार्थ सोनू निगमचा ट्विटरला रामराम

ट्विटरवरुन आक्षेपार्ह टिवटिव करणाऱ्या गायक अभिजीत भट्टाचार्यला सस्पेंड केल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ गायक सोनू निगमने धाव घेतली असून स्वत:चं ट्विटर अकाऊंट त्याने डिलिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनी काश्मिरमध्ये दगड फेकणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी युवकाचा मानवी ढाल म्हणून उपयोग करण्याऐवजी अरुंधती रॉय यांनाच जीपला बांधायला हवे होते, असे वादग्रस्त ट्विट केले होते. गायक अभिजित भट्टाचार्यने त्यांच्या या ट्विटचे समर्थन केले. त्याने अरुंधती यांना गोळ्या घालायला हव्यात, असे आणखी एक वादग्रस्त ट्विट त्याने केले होते. ट्विटर इंडियाने त्यानंतरच अभिजीतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याचे पाहायला मिळाले.

या गोष्टीचा सुगावा गायक सोनू निगमला लागताच त्याने एकामागोमाग एक बरेच ट्विट करत अभिजीतचे समर्थन केले. त्याने या सर्व प्रकारावर नाराजीचा सूर आळवत अभिजीतच्या समर्थनार्थ आपले ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचे जाहीर केले आहे. ट्विटरवरील या एकतर्फी व्यवहाराच्या विरोधात मी आज ट्विटरवरुन काढता पाय घेत आहे. प्रत्येक समजुतदार आणि देशभक्त व्यक्तीने असेच करायला हवे, असे म्हणते अखेर सोनूने ट्विटरवरुन काढता पाय घेतला.