ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रभासमुळे अनुष्का अजूनही अविवाहित

प्रभास आणि अनुष्का शेट्टी हे दोन दाक्षिणात्य कलाकार संपूर्ण देशालाबाहुबलीचित्रपटामुळे कळले. अनुष्का शेट्टी प्रभास या दोघांच्या चाहत्यांची संख्या या चित्रपटानंतर कैकपटींनी वाढली. त्यांचे चाहते प्रभास आणि अनुष्का यांचे जुने चित्रपटही बघायला लागले. तमिळ, तेलगु भाषा ज्यांना येत नाहीत ते चाहतेही या दोघांसाठी त्यांचे जुने चित्रपट वारंवार पाहत आहेत.

पण आता एक अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अशी की अनुष्काने तिचे लग्न प्रभासमुळेच दोन वर्षे पुढे ढकलले होते. दोन वर्षांपूर्वीच अनुष्का लग्न करणार होती. पण प्रभासने तिला एवढ्यात लग्न करण्याचा सल्ला दिला. प्रभासने आपल्या आयुष्याची पाच वर्षेबाहुबलीचित्रपटाच्या दोन्ही भागांसाठी दिली होती. अनुष्काने देखील तशीच मेहनत केली होती. पण अनुष्काबाहुबली हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी लग्न करण्याचा विचार करत आहे, असे जेव्हा प्रभासला कळले तेव्हा त्याने तिला लग्न करण्याचा सल्ला दिला. अनुष्काचे लक्षबाहुबली वरून जराही विचलीत होता कामा नये, असे प्रभासला वाटत होते. कारण या चित्रपटासाठी त्याने अनुष्काने खूप मेहनत केली होती. तिने प्रभासचा सल्ला मानला आणि स्वतःचे लग्न दोन वर्षे पुढे ढकलले. पण आताबाहुबली चित्रपट प्रदर्शितही झाला आणि सुपरहिटही झाला. पण आता खरच अनुष्का लग्न करणार का?