ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पहिल्यांदाच तृतीयपंथीची भूमिका साकारणार छाया कदम

अनेक तृतीयपंथी भूमिका गेल्या कित्येक वर्षांमध्ये चित्रपटांमध्ये गाजल्या असून त्यात सदाशिव अमरापुरकर यांनी साकारलेली सडक चित्रपटामधील भूमिका अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. आपण आजवर चित्रपटांमध्ये तृतीयपंथी भूमिकांमध्ये पुरूषांनाच निभवताना पाहिले आहे. पण आता एक अभिनेत्री पहिल्यांदाच तॄतीयपंथीयाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे. ही अभिनेत्री एका वेब सिरीजमध्ये तृतीयपंथीयाच्या भूमिका साकारत आहे.

ही भूमिका आपल्यालाव्हायरस मराठीया वेब सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे. ही भूमिका दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्याफँड्री’, ‘सैराटया चित्रपटांमध्ये वेगळ्या आणि तितक्याच महत्वाच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री छाया कदम साकारणार असून आपल्या या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री छाया कदम तृतीयपंथीयाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. मुकेश माचकरांनी लिहिलेल्या कथा या वेबसिरीजमध्ये बघायला मिळणार आहेत. ट्रेनमधील कल्याण ते सीएसटी या प्रवासादरम्यान याचे शूटींग करण्यात आले आहे.

छाया यांनीशॉककथाया सिरीजमधीलहिजडाया एपिसोडसाठी प्रमुख भूमिका निभावली आहे. फक्त पुरुष कलाकारांनीच आजवर हिजड्याच्या भूमिका केल्या आहेत पण स्त्री कलाकार कधी या भूमिकेमध्ये दिसली नाही. म्हणून मीहिजडाची कहाणी आधी छायाला ऐकवली आणि या भूमिकेसाठी छायाचा होकार आल्यानंतर लगेच तिची लुक टेस्ट आणि स्क्रीन टेस्ट घेतली गेली. आम्ही सगळे चित्रीकरण प्रत्यक्ष लोकेशनवरच केले आहे, असे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी सांगितले.

छायाने या वेगळ्या भूमिकेबद्दल सांगितले की, जेव्हा मला ही कथा कोल्हेंनी ऐकवली मी तेव्हाच ती करायचा निर्णय घेतला. हिजडा प्रत्यक्षात आणण्यासाठी आमचा प्रवास निराळा होता. नेहमी वेगळ्या भूमिकांच्या शोधात अभिनेत्री छाया कदम ही असते. आता ती तॄतीयपंथीच्या भूमिकेत बघायला मिळणार असल्याने तिच्या या भूमिकेचीही उत्सुकता वाढली आहे. पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री अशी भूमिका साकारत असल्याने त्यासाठी तिला खूप मेहनतही घ्यावी लागली असेल, हे मात्र नक्की.