ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

म्हणून सचिनने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं

मुंबई, दि. २७ - सिनेमाच्या प्रमोशनसाठी कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये कुणी सहभागी झालं नाही, असं उदाहरण अपवादानेच पाहायला मिळतं. मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या बायोपिकच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये का गेला नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. सचिनने शोमध्ये यावं, यासाठी कपिलच्या टीमने सर्वोतोपरी प्रयत्न केले. कपिल शर्माचा सहकारी सुनील ग्रोव्हरने शोला रामराम ठोकल्यापासून या शोची लोकप्रियता कमी झाल्याचंही बोललं जातं. त्यामुळे सचिनच्या निमित्ताने या शोला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मिळण्याची शक्यता होती. मात्र तसं झालं नाही.

सचिन बिलीयन ड्रीम्सचं प्रमोशन कोणत्याही हिंदी कार्यक्रमात केलं जाणार नाही, असं सचिनने अगोदरच प्रोडक्शनला सांगितल्याचं बोललं जातं. त्यामुळेच सचिन कपिलच्या शोमध्येही दिसला नाही. दरम्यान सचिनने प्रमोशनसाठी मराठी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता, शिवाय मराठी वृत्तवाहिन्यांनाही मुलाखत दिली आहे.

सचिन बिलीयन ड्रीम्सहा सिनेमा आज हिंदी आणि मराठीसह इतर भाषेतही रिलीज झाला. राज्यात हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे.