ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रामूची ट्विटरवरून एक्झिट

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा गेल्या काही वर्षांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा ट्विटरवरील वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आता यापुढे असे होणार नाही. कारण ट्विटरच्या मायाजालातून रामूने स्वतः काढता पाय घेतला आहे. राम गोपाल वर्माने गेल्या शनिवारी शेवटचे ट्विट करून तो ट्विटर अकाऊंट बंद करत असल्याचे सांगितले. यापुढे तो केवळ फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येऊ शकणाऱ्या इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.

रामूने २७ मे २००९ मध्ये ट्विटवर सक्रिय राहण्यास सुरुवात केली होती. पण आता आपल्या वाचाळ ट्विटसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या दिग्दर्शकाने ट्विटवरून काढता पाय घेण्यामागचे कारण मात्र सांगितले नाही. मी ट्विटर अकाऊंट बंद करत आहे. मला गेल्या काही वर्षांपासून फॉलो करणाऱ्यांचा मी आभारी नाही, असे त्याने ट्विट केले. यापुढे मी फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टाग्रामद्वारे तुमच्याशी संवाद साधेन, असेही त्याने म्हटले आहे. शेवटच्या ट्विटमध्ये त्याने लिहिलंय की, ‘ट्विटरवरील माझ्या मृत्यूपूर्वी माझे शेवटचे ट्विट….. यापुढे मी आरजीव्ही झूमइनवर मन लावून काम करणार आहे.