ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सनी लिओनी लातूरमध्ये, पत्रकाराच्या प्रश्नानंतर धक्काबुक्की

लातूर, दि. ३१ - अभिनेत्री सनी लिओनीने आज लातूरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र सनी येणार असल्यामुळे आधीच तापलेल्या लातूरमधील वातावरण आणखी हॉट झालं. पण सनीच्या कार्यक्रमात धक्काबुक्कीचा प्रकार झाला. सनीच्या हस्ते एका फिटनेस क्लबचं उद्घाटन झालं. संध्याकाळी होणारा हा कार्यक्रम अचानकपणे दुपारीच उरकण्यात आला. त्यानंतर सनीने पत्रकारांशी संवाद साधला.

एका पत्रकाराने सनीला, आपण बोल्ड चित्रपटात काम करता याबाबत आपणास वाईट वाटते का असा प्रश्न विचारला. त्यावर आयोजकांनी प्रश्नावर आक्षेप घेत बाचाबाची केली. ही बाचाबाची पुढे धक्का-बुक्कीपर्यंत पोहोचली. पण सनी लिओनीने मध्यस्थी करत, इट्स ओके म्हणत आयोजकांना आवरलं. इतकंच नाही तर पुढे प्रकरण चिघळणार नाही, याची काळजीही घेतली. या सर्व प्रकाराननंतर आयोजकांनी सारवासारव करत त्याच ठिकाणी माफीनामाही सादर केला.