ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अंजलीच्यासमोरच ऐश्वर्याने मारली सचिनला मिठी

सचिन: बिलियन्स डिम्सहा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट नुकताच रिलीज झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एक खास प्रिमियर शो आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये क्रिडा क्षेत्रापासून बॉलिवूड सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.बिग बी अमिताभ बच्चन यांच्या परिवाराने या प्रिमियरसाठी उपस्थिती लावली होती.

यूट्यूबवर या प्रिमियर शो दरम्यानचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि अभिनेता अमिताभ बच्चन हे एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत आणि त्याच दरम्यान सचिन तेंडुलकर याची पत्नी अंजली तेथे पोहोचते. त्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन तेथे दाखल होतात. आपले सासरे सचिन तेंडुलकरसोबत गप्पा मारत असल्याचे पाहून अभिनेत्री ऐश्वर्या राय काही अंतर ठेवून लांबच उभी होती. सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली ही त्याच्या जवळ जावून उभी राहते. अंजली तेंडुलकरचे हावभाव पाहून कळते की, ती ऐश्वर्या आणि अभिषेक यांना सचिन तेंडुलकर यांची भेट घडविण्यासाठी तेथे उभी आहे. मात्र, सचिन तेंडुलकर आणि अमिताभ एकमेकांसोबत गप्पा मारत असल्याने अंजलीही शांत राहते.

याच दरम्यान, सचिन तेंडुलकरला भेटण्यासाठी ऐश्वर्या राय पूढे येते. ऐश्वर्याला सचिनही भेटतो. मग, ऐश्वर्या पूढे जाऊन सचिन तेंडुलकरला मिठी मारते आणि त्याला चित्रपटासाठी शुभेच्छा देते. सचिन तेंडुलकरला ऐश्वर्या ही मिठी मारत असल्याचे पाहिल्यानंतर अंजली दूसरीकडे पाहण्यास सुरुवात करते. हा व्हिडिओ यूट्यूबवरुन घेण्यात आला आहे.