ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

संजय जाधव घेऊन येत आहे ‘येरे येरे पैसा’

मुंबई, दि. ७ - येरे येरे पावसाच्या ऐवजी येरे येरे पैसा असे म्हणून जून महिन्याची सुरूवात करायला लागणार हे नक्की. कारण दिग्दर्शक संजय जाधव यांच्या आगामी चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे. संजय जाधव यांचा तब्बल दिड वर्षांनी येरे येरे पैसा हा आगामी चित्रपट जानेवारी २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२०१८ मधील येरे येरे पैसा हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे ज्याच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मिडीयावर प्रसिध्द केली गेली. टिझर पोस्टरवर खूप साऱ्या उडणारया नोटा आपल्याला बघायला मिळतात तसेच२०१८ साल पैशांचे आहेअशी हायलाईटेड लाईन पोस्टरवर आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांचा चित्रपट आणि यातील कलाकार म्हणजे नक्कीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार यात वादच नाही.

अमेय खोपकर, पर्पल बुल एंटरटेनमेंट आणि ट्रान्स एफएक्स स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटातील पात्र, यातील कलाकार मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढते. चित्रपटाची निर्मिती अमेय खोपकर, ओम प्रकाश भट आणि सुजय शंकरवार यांनी केली आहे.