ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आता हिंदीतही जय मल्हार

मुंबई, दि. ७ - मराठी प्रेक्षकांनी संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडेरायांवर आधारित असलेल्याजय मल्हारया मालिकेला भरभरून प्रेम दिले. पण आता ही मालिका हिंदीमध्ये बघायला मिळणार आहे. नुकताचजय मल्हारमालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण ही मालिका आता हिंदी भाषेत डब केली जाणार आहे. झी हिंदी चॅनेलवर ही मालिका पुढच्या काही दिवसात प्रसारित केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. जय मल्हार ही हिंदीत डब होणारी पहिलीच पौराणिक मराठी मालिका असेल.

जय मल्हारच्या तामिळ भाषेतील व्हर्जनलाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. खंडेराय, म्हाळसा, बानू यांच्या भूमिकांना हिंदीत आवाज देण्यासाठी व्हॉइस आर्टिस्ट्स नेमण्यात आले असल्याचे वृत्त आहे. या मालिकेची निर्मिती दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांनी केली आहे. माझी ही कलाकृती पहिल्यांदाच हिंदीसाठी डब होत असल्याचा मला अभिमान वाटत असल्याचे मत महेश कोठारे यांनी व्यक्त केले आहे.

एखाद्या हिंदी मालिकेप्रमाणेच या मालिकेची निर्मिती करण्यात आली होती. मराठीतील ही भव्य मालिका आता देशभर पोहोचणार आहे. निर्मात्यांनी मालिका संकलन करतानाच्या सगळ्या अनमिक्स मास्टर टेप्स चॅनेलकडे सूपुर्द केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात आणखी काही भाषांमध्येही याच्या डब व्हर्जन्स निघण्याची शक्यता आहे.