ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

शेतकरी आंदोलन जितकं दाबाल, तितकं उफाळून येईल - नाना पाटेकर

मुंबई, दि, ७ - शेतकऱ्यांना आंदोलनासाठी मैदानात उतरावं लागावं हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे. शेतकरी आंदोलन जितकं दाबण्याचा प्रयत्न होईल तितकं ते जास्त उफाळून येईल. तसंच शेतकऱ्यांची एकच संघटना असावी, त्यांनी एकत्र येऊन एका छत्राखाली संघर्ष करावा, अशी अपेक्षा नानाने व्यक्त केली.

फडणवीस सरकारला हात जोडून विनंती करतो, शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मान्य करा, असं नाना म्हणाले. शेतकरी आणि समाजातील इतर स्तरांमध्ये जी आर्थिक दरी आहे ती दूर करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावा. तसंच सक्षम लोकांनी स्वत:हून पुढे येऊन कर्जमाफी नाकारली पाहिजे, असं मत नाना पाटेकरांनी व्यक्त केलं.

नामफाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करणारे अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शेतकरी संपावर भाष्य केलं.