ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सोनीचा कपिल शर्माला बाबाजी का टूल्लू

मुंबई, दि. ८ - गेले काही दिवस लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर असलेल्या कपिल शर्मा शोला उतरती कळा लागली असून सुनील ग्रोव्हर आणि टीमसोबत झालेल्या भांडणानंतर त्यांनी शोपासून फारकत घेतली. त्यानंतर हा शो लोकांना हसविण्यात अयशस्वी ठरला आहे.

कपिल शर्मा शो हास्य अभिनेता सुनील ग्रोव्हरने सोडल्यानंतर कपिलच्या घराचे वासे फिरले आहेत. कपिलच्या घरात घडणाऱ्या कोणत्याच गोष्टीने प्रेक्षकांना हसू येत नाही. त्यामुळे शो बंद होण्याच्या मार्गावर असून कपिल चांगलाच चिंतेत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे कपिलला सोनी एंटरटेन्मेंट चॅनलने एका महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. सुनील ग्रोव्हरने कपिलबरोबर झालेल्या वादानंतर या शोला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुगंधा मिश्रा यांनीही हा शो सोडल्याने कपिलच्या शोचा टीआरपी घसरला आहे.

राजू श्रीवास्तव सारख्या तगड्या विनोदी अभिनेत्यालाही कपिलने शोमध्ये घेऊन पाहिले. पण बराच प्रयत्न करूनही एकाही विनोदावर प्रेक्षक हसले नाहीत. त्यामुळे कपिलला अवघ्या पंधरा मिनिटात चित्रीकरण गुंडाळावे लागले होते. कपिल शर्मा शोचा टिआरपी गेल्या काही महिन्यांपर्यंत खूपच चांगला होता. त्यामुळे कोणताही कलाकार त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पहिली पसंती कपिल शर्मा शोला देत असे. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. सलमानच्या ट्युबलाईट या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाचे सलमान जोरदार प्रमोशन करत आहे.

सलमानने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोला यावेळी पसंती दिली नाही. तो सोनी या वाहिनीवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुपर नाइट या कार्यक्रमात झळकणार आहे आणि या कार्यक्रमात त्याच्यासोबत अली असगर, सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले असणार आहेत. त्यामुळे कपिल शर्मा शो ला हा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसत आहे.