ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

थुकरटवाडीत ‘भाऊबली’ची एंट्री

चला हवा येऊ द्याच्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील, याचा काही नेम नाही. या मंचावर आजवरमाहेरची साडीपासून तेनटसम्राट’, सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेपासून आजच्यादंगलपर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे. पण या मंचावर आता प्रेक्षकांना भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्याबाहुबली या चित्रपटाचे मराठमोळे रुप बघायला मिळणार आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक नवनवे विक्रमबाहुबलीया चित्रपटाने रचले. हा चित्रपट जेवढा लोकप्रिय ठरला त्यापेक्षाही जास्त चर्चिला गेला याचा पुढचा भाग असलेलाबाहुबली हा चित्रपट ठरला. व्हिएफएक्स तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि डोळे दिपवणारे साहसदृष्ये ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये ठरली. अजूनही अनेक चित्रपटगृहातबाहुबली ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोच आहे.

थुकरटवाडीकरांनीही मगबाहुबली ची ही लोकप्रियता बघता प्रेरणा घेतभाऊबलीहा चित्रपट बनवला. ज्यात मुख्य भूमिकेत भाऊ कदम, देवसेनेच्या भूमिकेत श्रेया बुगडे, भल्लाळदेवच्या भूमिकेत अंकुर, शिवगामीच्या भूमिकेत सागर कारंडे, तिचा पती बिजालदेवच्या भूमिकेत भारत गणेशपुरे आणि कटप्पाच्या भूमिकेत कुशल बद्रिके बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे चित्रपटात ज्याप्रमाणे स्पेशल इफेक्ट्सचा खास वापर करण्यात आला आहे तसाच वापर येथेही दिसणार आहे आणि त्याच्या सोबतीला असेल विनोदाचा जबरदस्त तडका असणार आहे.

आपल्या स्किटमध्येबाहुबली सारख्या कल्पेनेपलिकडच्या चित्रपटाला उतरवणे ही कल्पनाही तेवढीच भन्नाट आहे. त्यामुळेच थुकरटवाडीकरांचा हा भाऊबलीचला हवा येऊ द्याच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. येत्या सोमवारच्या भागात म्हणजे १२ जूनला रात्री .३० वाजताझी मराठीवर हे खास स्किट बघायला मिळणार आहे.