ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चीनच्या राष्ट्रपतींनीही केले ‘दंगल’चे कौतुक

मुंबई, दि. १० - बॉक्स ऑफिसवरच अभिनेता आमिर खान याचादंगलहा चित्रपट हिट ठरला नाहीतर संपूर्ण विश्वात प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात यशस्वी ठरला. एवढेच नाही तरदंगलचित्रपट पाहिल्यानंतर चीनच्या राष्ट्रपतींनीही या चित्रपटाचे कौतुक करण्यापासून राहू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दंगल चित्रपट आवडल्याचे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.

शांघाय सहयोग संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या कझाकस्तानच्या दौ-यावर असून मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची या दौ-यात भेट झाली. यावेळी त्यांनी दोन्ही देशातील संबंध आणि व्यापारावर महत्त्वाची चर्चा केली. त्यानंतर शी जिनपींग यांनी दंगल चित्रपट चीनमध्ये चांगली कमाई करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले. भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी सांगितले की, या शिवाय दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक सहयोग वाढवण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच शी जिनपींग यांनी स्वतः हा चित्रपट पाहिला आणि तो त्यांना आवडला आहे.