ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मराठी चित्रपटात काम करण्यास ऐश्वर्या उत्सुक

मुंबई, दि. १२ - बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने चांगले स्क्रीप्ट मिळाले तर मराठी चित्रपटात भूमिका करायला आवडेल असे सांगितले. विक्रम फडणीस यांच्या हृदयांतर या पहिल्याच चित्रपटाच्या म्युझिक लाँचिंग कार्यक्रमाच्या उद्रघाटनात ती बोलत होती. पत्रकरांनी जेव्हा तिला मराठी चित्रपट करायला आवडेल का असे विचारले तेव्हा तिने सर्वप्रथम सार्वजनिक कार्यक्रमात हा प्रश्न विचारल्याबद्दल मिडीयाचे आभार मानले.

ऐश्वर्या म्हणाली, मी अभिनेत्री आहे आणि चित्रपट मग तो कोणत्याही भाषेतील असेल तरी मला त्यात भूमिका करणे आवडेल. मराठी चित्रपटातही भूमिका करायला आवडेल. कथा आवडली तर नक्कीच ही संधी घेईन. १९९७ साली इरूवर या तमीळ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत ऐश्वर्याने प्रवेश केला होता. ती म्हणाली, चित्रपट सृष्टीत येताना मी रूळलेल्या वाटांवर कधीच चालले नाही तर माझ्या वाटा मीच शोधल्या आहेत. मराठी चित्रपटाची कथा आवडली तर कुठल्याही टीमबरोबर काम करण्याची तयारी तिने दाखविली.

विक्रम फडणीस यांच्या हृदयांतर चे लाँच शाहरूखखानने केले असून त्यानेच पहिला क्लॅपही दिला होता. या चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, तृष्णिका शिंदे निष्ठा वैद्य यांच्या भूमिका आहेत हा चित्रपट जुलैला रिलीज होणार आहे.