ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अनुष्काच्या घाबरवणाऱ्या ‘परी’चे पोस्टर रिलीज

मुंबई, दि. १३ - परी म्हटल्यावर आपल्या नजरे समोर येतात डिस्नेमधील सुंदर प्रिन्सेस येऊन उभ्या राहतात. पण, अनुष्का शर्माची परी त्या पऱ्यांसारखी नाही. त्या पऱ्यांच्या विरुद्ध ही परी पूर्णतः आहे. काहीसे घाबरवणारे असे या परीच्या चेहऱ्यावरील भाव असून या परीच्या चेहऱ्यावर आपल्या नजरेतून आणि चेहऱ्यावरील भावनांनी समोरच्याच्या मनात भीती निर्माण करणारे भाव आहेत. अनुष्का शर्माच्या आगामीपरीचित्रपटाच्या पोस्टरवर या सर्व गोष्टी पाहावयास मिळतात. या चित्रपटाचे चित्रीकरण आजपासून सुरु होत आहे.

अनुष्का शर्माने आतापर्यंत निर्मिती केलेले चित्रपट हटके असल्याचे आपण पाहिले आहे. मग तोएनएच १०असो वा भूतावरील आधारित विनोदीफिल्लौरीचित्रपट. तिचा आगामीपरीचित्रपटही याच रांगेत येत आहे. अनुष्का आणि परमब्रता चॅटर्जी यामध्ये मुख्य भूमिकेत दिसतील. आपण या बंगाली अभिनेत्याला विद्या बालनच्याकहाणीया चित्रपटात पाहिले आहे. प्रोसित राय या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून, याचे चित्रीकरण मुंबई आणि कोलकाता येथे होईल.

अनुष्का काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीत म्हणालेली की, क्लीन स्लेट फिल्म्स नेहमीच उत्तम आणि गुंतवून ठेवणाऱ्या कथांवर लक्ष केंद्रित करते. आम्हाला नवीन कलाकारांना संधी दिल्यामुळे नवीन कल्पना आणि अभिनव संकल्पना मिळतात. ‘परीची कथा अप्रतिम असून माझा यावर पूर्ण विश्वास आहे. क्लीन स्लेट आणि क्रिअर्ज एण्टरटेंन्मेन्टची निर्मिती असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल.