ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मराठी चित्रपटाचे पोस्टर रणवीर सिंहने केले लाँच

मुंबई, दि. १४ - जेव्हापासून मराठी चित्रपट निर्मितीत बॉलिवूडकर उतरले आहेत बॉलिवूडची स्टार-मंडळी तेव्हापासून बऱ्याच मराठी चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसत आहेत. मराठी चित्रपटांच्या प्रमोशन्समध्ये शाहरुख खान, काजोल, ह्रतिक रोशन, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन वगैरे सुपरस्टार्स दिसले आहेत. अजून एका नावाची भर त्यात पडली आहे. हा अभिनेता आहे महा-चुलबुल सुपरस्टार रणवीर सिंह. कालच त्याने आपल्या सोशल साईटवरभिकारीचित्रपटाचे टीजर पोस्टर ट्वीट करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला भरपूर शुभेच्छा दिल्या.

मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच गणेश आचार्य दिग्दर्शितस्वामी तिन्ही जगाचाभिकारीहा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. गतवर्षी या चित्रपटाचा मुहूर्त मोठ्या गाजवाजात महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या हस्ते झाला होता.

या चित्रपटाच्या टिजर पोस्टरवर छत्री तोंडावर घेऊन एक मनुष्य झोपला असल्याचे चित्र आपल्याला दिसून येते. सुटाबुटात असलेला हा मनुष्य मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी असावा असे वाटते, परंतु छत्रीत त्याचे तोंड झाकले असून, त्याच्या शेजारी भिकाऱ्याचे वाडगे दिसत असल्यामुळे, या टिजर पोस्टरवरील मनुष्य स्वप्नीलच आहे का? आणि त्याची या चित्रपटात नेमकी काय भूमिका आहे, असे अनेक प्रश्न पडतात. अशाप्रकारे आपल्याला नकळत संभ्रमात टाकणा-या या टिजर पोस्टरने, अल्पावधीतच सोशल साईटवर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे.

या चित्रपटाबाबत स्वप्नीलदेखील खूप उत्सुक आहे. आतापर्यंतच्या भूमिकेहून अगदी वेगळी अशी भूमिका त्याची यात असल्यामुळे हा चॉकलेट बॉयभिकारीचित्रपटामध्ये नेमका काय करणार असेल, हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे. बॉलीवूडचे आघाडीचे नृत्यदिग्दर्शक म्हणून ख्याती असलेले गणेश आचार्य यांनी याआधी काही हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. मात्र मराठीत ते पहिल्यांदाचभिकारीया चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. तसेच गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रॉडक्शनची स्थापना करून चित्रपट निर्मितीमध्ये प्रथम पाऊल टाकले आहे Posted On: 14 June 2017