ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

श्रीदेवी आता मिस्टर इंडिया २ साठी सज्ज

मुंबई, दि. १५ - ८० चे दशक श्रीदेवीने अक्षरशः गाजवून सोडले होते. तिच्या प्रत्येक चित्रपटांनंतर तिच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली आणि ती लोकप्रियता आज देखील कायम असून जेव्हाइंग्लिश विंग्लिशहा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा आतापर्यंत कोणीही पाहिलेली श्रीदेवी प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाली होती. ती सध्या तिच्या आगामीमॉमया चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर पाहून एक चांगली कलाकृती पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशी आशा आहे.

या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. एक हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख असलेला नवाजही श्रीदेवीसमोर संवाद बोलताना अनेकदा अडखळला होता. नवाजने याची कबुली स्वतः दिली. तो म्हणाला की, संपूर्ण चित्रपटात श्रीदेवीसोबत त्याचे फक्त तीन सीन आहेत. पण ते तीन सीन करतानाही तो अनेकदा अडखळायचा, चुकीचा शब्द बोलायचा किंवा संवादच विसरायचा.

या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली असून ते या चित्रपटावर सध्या एवढे खूश आहेत की लवकरच ते त्यांचे दुसरे प्रोजेक्टही घरच्या कलाकारांना एकत्र घेऊन करणार आहेत. बोनी कपूर सध्यामिस्टर इंडिया हा चित्रपट करण्याच्या बेतात आहेत. श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका मिस्टर इंडियामध्ये होत्या. या चित्रपटाचे नाव ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत आजही आवर्जुन घेतले जाते.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या चित्रपटाच्या कथेवर बोनी कपूर काम करत असून श्रीदेवी आणि अनिल यांच्यासोबत अजून एक जोडी या चित्रपटात घेण्यात येणार असून जिथे मूळ मिस्टर इंडियाची कथा संपते तिथून पुढे दुसऱ्या भागाची कथा सुरू होणार आहे. पण पुढचा भाग करायचा आहे म्हणून काहीही करण्यात अर्थ नाही हे बोनी पुरेपूर जाणून आहेत. म्हणून ते सध्या या चित्रपटाच्या कथेवर फार मेहनत घेत आहेत.